मुंबई | बॅंकीग क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरूण तरूणी प्रयत्न करताना दिसतात. अशाच बॅंकीग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (इंडबँक) (IndBank Bharti) अंतर्गत “डीलर” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
डीलर पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी २२ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बॅंकेच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन (ईमेल) किंवा ऑफलाईन दोन्ही पध्दतीने (IndBank Bharti) करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक लिंक खाली दिलेली आहे. या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
डीलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने NISM/NCFF (NISM/NCFM) मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संबंधित व्यवहाराचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. (IndBank Bharti)
या पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीव्दारे केली जाईल. तत्पूर्वी निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांची स्क्रीनिंग समितीमार्फत ओळख पटवली जाईल. त्यासाठी ही समिती प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करेल. त्यानंतर मुलाखत आणि अंतिम निवड केली जाईल.
डीलर पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आम्ही दिलेल्या बॅंकेच्या अधिकृत लिंकवर जाऊन थेट अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदभरतीसाठी आवश्यक अटी शर्ती वाचून मग उमेदवारांनी अर्ज करावेत. Indbank Career