Indian Maritime University Recruitment | 26 रिक्त पदांसाठी भरती; ‘या’ पध्दतीने लगेच अर्ज करा

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमध्ये नोकरीची (Indian Maritime University Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ही युनिव्हर्सिटी सागरी विज्ञान, सागरी इतिहास, सागरी कायदे, सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव, धोकादायक मालाची वाहतूक, पर्यावरण अभ्यास आणि इतर संबंधित क्षेत्रांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते.

याठिकाणी असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी युनिव्हर्सिटीनं (Indian Maritime University Recruitment) इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.imu.edu.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 4 मे आहे आणि अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 9 मे आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीची ही भरती (Indian Maritime University Recruitment) मोहीम 26 रिक्त पदे भरण्यासाठी राबवली जात आहे. त्यापैकी 14 रिक्त जागा असोसिएट प्रोफेसर पदाच्या आहेत आणि 12 रिक्त जागा असिस्टंट प्रोफेसर पदाच्या आहेत.

अॅप्लिकेशन फी : एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्जाची फी 700 रुपये आहे. इतर प्रवर्गातील सर्व अर्जदारांसाठी अर्जाची फी 1000 रुपये आहे.

ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी, ‘रजिस्ट्रार, इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, सेमेनचेरी, शोलिंगनलूर पोस्ट, चेन्नई – 600119,’ या पत्त्यावर सबमिट करावी लागेल. निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अंदाजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतील.

Recent Articles