मुंबई | भारतीय नौदल अग्निवीर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2023) नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.
भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (MR) 02/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 120 पदे भरल्या जाणार आहेत. (Indian Navy Agniveer Bharti 2023)
उपलब्ध पदभरतीमध्ये MR पदाच्या 100 व 20 जागा महिलांकरिता आहेत. अर्ज प्रक्रिया 29 मे 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवार 29 मे ते 15 जून 2023 या कालावधीत https://agniveernavy.cdac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी योग्य तपशील भरण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अॅप्लिकेशन फॉर्म भरताना स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करावी. तसेच अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – https://agniveer_recruitment.pdf
ऑनलाईन अर्जाची लिंक – https://agniveer.recruitment/application (29 मे पासून)