नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा (IPHB Goa Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आणि व्यावसायिक थेरपिस्ट पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (IPHB Goa Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आवश्यक :-
१) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ (१९५६ चा कायदा क्र. १०२) मधील
(परवाना देणाऱ्या पात्रतेव्यतिरिक्त) पहिल्या किंवा दुसऱ्या पत्रकातील किंवा तिसऱ्या पत्रकातील भाग II मध्ये अंतर्भाव करण्यात आलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता. तसेच शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ (१९५६ चा कायदा क्र. १०२) मधील कलम १३ मधील उप कलम (३) मध्ये घालण्यात आलेल्या तिसऱ्या पत्रकातील भाग II मधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. (IPHB Goa Recruitment)
२) पदव्युत्तर पदवी किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (आधीचे भारतीय वैद्यकीय परिषद) द्वारे मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेमधून संबंधित वैशिष्ट्यातील समतुल्य पात्रता.
३) आवश्यक पदव्युत्तर पदवीनंतर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/प्रशिक्षण संस्था येथे संबंधित वैशिष्ट्यामधील वरिष्ठ निवासी (सीनियर रेसिडेंट ) / निबंधक (रजिस्ट्रार ) / प्रशिक्षक (ट्यूटर)/ निदर्शक (डेमोन्स्ट्रेटर) म्हणून किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव.
४) कोंकणी भाषेचे ज्ञान.
अपेक्षित :-
(i) मराठी भाषेचे ज्ञान
व्यावसायिक थेरपिस्ट आवश्यक :-
१) विज्ञान विषय घेऊन माध्यमिक/ उच्च माध्यमिक / सीनियर केम्ब्रिज किंवा समतुल्य.
२) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑक्युपेशनल थेरपीमध्ये पदविका (डिप्लोमा).
(३) कोंकणी भाषेचे ज्ञान.
अपेक्षित :-
१) कोणत्याही इस्पितळामधील ऑक्युपेशनल थेरपीचा अनुभव.
वेतनश्रेणी –
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता – Rs. 95,000/- per month
व्यावसायिक थेरपिस्ट – Rs. 43,335/- per month (IPHB Goa Recruitment)
अधिकृत वेबसाईट – iphb.goa.gov.in