iPhone बनवणाऱ्या कंपनीत होणार बंपर भरती! ‘या’ महिन्यापासून होणार भारतात आयफोनची निर्मिती | Apple Jobs 2023

मुंबई | जगप्रसिध्द Apple चे iPhone आता लवकरच भारतात तयार होणार आहेत. फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्रस्तावित प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटक सरकारचे मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. (Apple Jobs 2023)

प्रस्तावित प्लांटचे काम लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकार 31 जुलैपर्यंत कंपनीला जमीन हस्तांतर करणार आहे. जॉर्ज चू यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर पाटील यांनी ही माहिती दिली. यात माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे हे देखील उपस्थित होते. (Apple Jobs 2023)

कंपनीला कर्मचार्‍यांमध्ये अपेक्षित कौशल्य सेट करण्यास सांगितले आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुलभ करण्यासाठी पावले उचलली जातील, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

तैवान-आधारित बहुराष्ट्रीय फॉक्सकॉनने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाला (KIADB) जमिनीच्या किमतीच्या ३० टक्के (९० कोटी रुपये) आधीच दिले आहेत. तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि दरवर्षी २० मिलियन युनिट्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Recent Articles