ISRO Career | इस्त्रो मध्ये नोकरी करायची इच्छा आहे? मग जाणून घ्या काय असतात पात्रतेचे निकष? कशी मिळते नोकरी..

मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ही अवकाश संशोधन क्षेत्रातील मोठी आघाडीची संस्था आहे. NASA नंतरची जगातील सर्वात मोठी अंतराळ संशोधन संस्था म्हणून इस्त्रोकडे पाहिले (ISRO Career) जाते. आतापर्यंत इस्रोने अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते; पण ‘इस्रो’मध्ये नोकरी (ISRO Career) कशी मिळवायची हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. यासंदर्भातच माहिती देणारा अहवाल ‘टेक गिग’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर..

इस्रो ही भारतातील एक आघाडीची आणि देशाच्या दृष्टीने महत्वाची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेत नोकरी (ISRO Career) मिळविण्यासाठी अनेकजण उत्सुक असले इथे नोकरी मिळवणे फार कठीण काम आहे. त्यामुळे जर तुम्हाला इस्रोमध्ये नोकरी मिळवायचीच असेल तर इस्रोच्या जॉब करिअर पेजवर लक्ष द्यावे लागेल. याठिकाणी तुम्हाला इस्त्रोमधील करिअरविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. आवश्यक असलेली अधिकृत लिंक पोस्टमध्ये दिलेली आहे.

इस्रोमध्ये नोकरी (ISRO Career) मिळविण्यासाठी प्राथमिक पात्रता काय?

जर तुम्ही 12वी नंतर ISRO मध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही आयआयएसटीचा आधार घेऊ शकता. IIST (Indian Institute of Space Science and Technology) नंतर ISRO तुम्हाला थेट नोकरी देऊ शकते. तसेच BTech नंतर तुम्ही ICRB परीक्षेद्वारे ISRO नोकरीसाठी देखील अर्ज करू शकता. तुम्ही ICRB परीक्षेत पात्र ठरल्यास, तुम्हाला पॅनल डिस्कशनसाठी बोलावले जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.

ICRB परीक्षेसाठी पात्रता निकष काय?

ICRB ही ISRO मध्ये निवडीसाठी एक प्रवेश परीक्षा आहे. BE, BTech, BSc (Eng.) आणि Diploma+BE/BTech (लॅटरल एंट्री) या चारपैकी एक पदवी असलेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

संगणक अभियांत्रिकी नंतर इस्रोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी खालील प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक

  1. B.Tech किंवा BE मध्ये किमान 65% गुण असणे आवश्यक आहे.
  2. वय 35 वर्षांपेक्षा कमी असावे.
  3. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षा द्यावी.
  4. ISRO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत आवश्यक आहे.

जर तुम्हाला इस्रो मध्ये एक शास्त्रज्ञ/इंजिनिअर म्हणून नोकरी करायची असेल तर पुढील मार्ग आहेत

  1. बी.टेक अथवा बी.ई  – तुम्हाला जर इंजिनीरिंग नंतर इस्रो मध्ये काम करायची इच्छा असेल तर साधारण दरवर्षी ICRB (ISRO Centralised Recruitment Board) परीक्षा घेते. त्यासाठी तुम्हाला इंजिनीरिंग मध्ये कमीत कमी 65 % असावे लागतात, आणि इस्रो जी परीक्षा घेते त्यात उत्तीर्ण व्हावे लागते. उत्तीर्ण झाल्यानंतर इस्रो तुमचा इंटरव्ह्यू घेते आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नोकरी मिळू शकते.
  2. IIST – 12 वि नंतर जेईई ऍडव्हान्स उत्तीर्ण होऊन IIST (Indian Institute of Space Science and Technology) मध्ये ऍडमिशन घेता येईल. त्यानंतर त्यांनी दिलेल्या निकषापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होऊन इस्रो साठी अर्ज करता येतो. हा दुसरा मार्ग आहे.
  3. PhD नंतर ही आपण इस्रो मध्ये त्यासंदर्भीत जागांसाठी अर्ज करू शकता.

शास्त्रज्ञ/इंजिनिअर व्यतिरिक्त विविध पदांसाठीही इस्त्रोमध्ये नोकरी मिळवता येते

वैद्यकीय क्षेत्र
1) मेडिकल ऑफिसर (MBBS)
2) फार्मासिस्ट (डिप्लोमा फार्मसी)
3) नर्स (डिप्लोमा)
तसेच कंट्रोलर, क्लार्क, टायपिस्ट, टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, प्लंबर, वेल्डर, फिटर (12 + ITI) अशा विविध जागा इस्त्रोमध्ये भरल्या जातात. त्यासाठी विविध निवड प्रक्रिया आणि विविध शैक्षणिक पात्रता लागते.

इस्रो मधील करिअर साठी पुढील लिंक तपासात राहा –  Careers – ISRO

Recent Articles