मुंबई | IT हे सध्याच्या घडीला जगभरात सर्वाधिक वाढणारे सेक्टर आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या अमाप संधी आणि भरपूर पगार आहेत. परंतु टेक बॅकग्राउंड नसलेल्यांसाठी आयटी क्षेत्रात काम मिळवणे अवघड होते. तरीही जर तुम्हाला IT क्षेत्रातच नोकरी करायची असेल तर नॉन टेक बॅकग्राऊंड (IT Jobs) असणाऱ्यांसाठीही काही पर्याय नक्कीच उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे.
आयटी क्षेत्रात येण्यासाठी संबंधित भाषा शिका (IT Jobs)
IT क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज येणे बेसिक प्रोग्रॅमिंग येणे गरजेचे आहे. लँग्वेज येत असलेल्या प्रोफेशनल्सची सध्या आयटी इंडस्ट्रीमध्ये आणि इतर ठिकाणीही खूप डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही पायथॉनसारखी बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून घेऊन आयटी क्षेत्राकडे वळू शकता.
प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये सर्टिफिकेशन कोर्स (IT Jobs )
तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मकडून प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये सर्टिफिकेशन कोर्स करू शकता. याचा तुम्हाला आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्यास फायदा होईल.
तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रातील एक्सपर्ट्सशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. लिंक्डइनसह असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षेत्रातील एक्सपर्ट्सशी कनेक्ट करू शकता.
दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात टेक्नॉलॉजी जगतातील सर्व अपडेट्स आणि डेव्हलपमेंट्सची माहिती असू द्या. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीबाबत अपडेटेड असाल तर त्याचा तुम्हाला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो.
तुम्ही सर्टिफिकेशन पूर्ण केलं असेल तरी चांगल्या पगाराची, चांगल्या पदाची आयटीतील नोकरी मिळवणं सोपं नाही. त्यामुळे या क्षेत्रात इंटर्नशिप करून तुम्ही करिअरची सोप्या पद्धतीने सुरुवात करू शकता. या माध्यमातून तुम्हाला आयटी क्षेत्रात सध्या डिमांडमध्ये असलेली स्कील्स व इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळेल.