मुंबई | इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (ITBP Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 202 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटर्नरी), कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) आणि कॉन्स्टेबल (केनलमन) पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 128 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 ऑगस्ट2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटर्नरी), कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) आणि कॉन्स्टेबल (केनलमन)
वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.