Career

ITBP Recruitment 2024 : आयटीपीबीमध्ये 526 जागांवर भरती; 21 हजारांपासून 1 लाख 12 हजारांपर्यंत पगाराची संधी 

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये युवकांसाठी नोकरीची (ITBP Recruitment 2024) सुवर्णसंधी आहे. आयटीबीपमध्ये तब्बल 526 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आयटीबीपी मध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन),  हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया टेम्पररी स्वरुपात केली जाणार असून या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरुपी नोकरीत संधी दिली जाऊ शकते. यासाठी 15 नोव्हेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहेत. 

ITBP अंतर्गत कोणत्या पदांसाठी किती जागांची भरती?

उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) – या पदाच्या एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 78 पुरुष उमेदवारांसाठी तर 14 महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना 35400 ते 112400 रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. 

हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – या पदाच्या एकूण 383 जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 325 आणि महिला उमेदवारांसाठी 58 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 25500 ते 81100 रुपये वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18-25 वर्ष दरम्यान असावे. 

कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – या पदासाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 44 जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. 7 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्ष असणे आवश्यक आहे.  निवड होणाऱ्या उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. 

उपनिरीक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जाचे शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. 

आयटीबीपीच्या या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. ही जाहिरात आयटीबीपीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. या भरतीपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अधिकृत वेबसाईट – ITBP

Back to top button