कल्याण | नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि इंजिनिअरिंग शाखेमध्ये शिक्षण झालेल्या उमेदवारांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची (KDMC Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक वर्षाच्या कालावधीकरीता (KDMC Bharti 2023) नियुक्ती करणेकामी पात्र उमेदवारांकडून दि. 15 मे पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भरण्यात येणारी पदे
डिग्री सिव्हील इंजिनिअर, डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर, डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर, डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर, डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर. (KDMC Bharti 2023)
शैक्षणिक पात्रता
1. डिग्री सिव्हील इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी ( Degree).
2. डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).
3. डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree).
4. डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).
5. डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree ).
6. डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).
अर्ज करण्याचा पत्ता –
उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – 421301
PDF जाहिरात – https://workmore.in/KDMC/Recruitment
अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in