Career

पाहिजेत | कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कुठे कुठे आहेत जॉब | Kolhapur Jobs 2024

कोल्हापूर | स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था आजरा अंतर्गत विविध जिल्ह्यात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग व मुंबई येथील कार्यालयांसाठी ही पदभरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती अंतर्गत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सिनीअर ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर, आयटी इंजिनिअर अशी विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य कार्यालय, मेन रोड आजरा, पिन. 416505 या पत्त्यावर पाठवावेत.


मेनन इंजिनिअरिंग सर्विसेस यांना विविध पदांसाठी मनुष्यबळाची आवशक्यता आहे. इंजिनिअरिग, कॉमर्स, बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातून शिक्षण घेतलेले उमेदवार यासाठी पात्र असून इच्छूकांनी hrd@menonengineering.com या पत्त्यावर अर्ज करावेत. या भरती अंतर्गत प्रोडक्शन हेड, फायनान्स मॅनेजर, मटेरिअल्स मॅनेजर, प्रोडक्शन सुपरवायजर यासोबतच विविध पदे भरली जाणार आहेत.


शिरोली एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीसाठी विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. फौंड्री आणि मशीन शॉपसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यामध्ये फौंड्री मोल्डिंग सुपरवायजर, लॅब असिस्टंट, मशीन शॉप डेव्हलपर, प्रोडक्शन हेड, लाईन इन्सपेक्टर, ऑपरेटर अशी विविध पदे भरती केली जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व्हाटस् अप किंवा इमेल करावेत. व्हाटस अप क्रमांक 9130493309 आणि इमेल sachin.kale@shridattafounders.com यावर पाठवावेत.


कागल एमआयडीसी येथील नामांकित कंपनीत सुपरवायझर तसेच रविराज मेटल्स पंचतारांकित एमआयडीसी येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करावेत.


मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग, टिटवे, ता. राधानगरी येथे विविध रिक्त पदे भरण्यात येत आहेत. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ट्यूटर, अॅडमिशन को ऑर्डिनेटर अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या इमेल पत्यावर आपले अर्ज पाठवावेत.

Back to top button