कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत ‘क्लार्क’ सह विविध पदांसाठी विविध जिल्ह्याकरिता मोठी भरती; संधी चुकवू नका

कोल्हापूर | बँकीग क्षेत्रात ‘क्लार्क’ पदासाठी नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत सांगली अर्बन को-ऑप बँक लि; सांगली (शेड्युल्ड बँक) या बँकेकरिता परभणी, बीड, सोलापूर, जालना, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पदवीधर उमेदवारांकडून “क्लार्क” पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत आले आहेत.

या पदभरतीअंतर्गत असणारी एकूण रिक्तपदे, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव यासाठी असोसिएशनच्या  www.kopbankasso.com या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जोडू नयेत. संकेतस्थळावरील नमुन्यातच अर्ज करावेत. अर्ज पाठविणेची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज kopbankasso.training@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. अर्जासोबत परीक्षा शुल्क रु. 1000/- (जीएसटीसह) विनापरतावा खाली दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करून दिनांक, UTR नंबर, शुल्क पावती नावासह किंवा स्क्रीन शॉट अर्जासोबत पाठवावा. फी भरणाऱ्या उमेदवारांनाच परीक्षेचे सूचनापत्र पाठविणेत येईल याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाचा तपशील –

1) वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेत कमीतकमी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक.
2) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
3) प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर.
4) उमेदवार हे परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील असणे आवश्यक.
5) वयोमर्यादा : कमाल 25 वर्षे (जन्म 01-03-1998 नंतर आवश्यक)
6) बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

PDF जाहिरात Ihttps://shorturl.at/lzW69
PDF जाहिरात IIhttps://shorturl.at/elvOZ
अधिकृत वेबसाईटkopbankasso.com


कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक & लेखनिक” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुन 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता 

महाव्यवस्थापक
कॉमर्स शाखेचा पदवीधर व सी. ए. आय. आय. बी / डी.बी.एम / डी. बी. एफ किंवा तत्सम किंवा चार्टड अकौंटंट किंवा कॉस्ट अकौंटंट किंवा एम. कॉम, एम.बी.ए. अनुभव : वरील पदाचा कोणत्याही सहकारी बँकेतील कमीतकमी ८ वर्षाचा अनुभव किंवा बंकींग क्षेत्रातील उच्च पदावरील कमीतकमी १२ वर्षाचा अनुभव.

शाखा व्यवस्थापक
बी.कॉम / एम.कॉम / एम.बी.ए., संगणकाचे अद्यावत ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB / GDCA/ICM/IIBF सहकारातील पदवी उत्तीर्ण यांना प्राधान्य, अनुभव : अधिकारी पदाचा सहकारी बँकेतील किमान १० वर्षांचा अनुभव अत्यावश्यक.

लेखनिक
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी./ मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक /JAIIB / CAIIB /GDCA बँकींग / सहकार कायदे विषयक पदवीका उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

PDF जाहिरात – https://shorturl.at/frCZ3

Recent Articles