नागपूर | तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत “कोतवाल” पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या विहीत नमुन्यात योग्य त्या कागदपत्रांसहित दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. (Kotwal Bharti 2023)
उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटो सहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 08 जुन, 2023 ते 22 जुन, 2023 पावेतो, सायंकाळी 05.00 वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर शहर यांच्या कार्यालयात सादर करावेत. (शासकीय सुटीचे दिवस, वगळून) व त्याबाबत पोच घ्यावी.
अर्जाचा नमुना तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेत व दिवशी (सुटटीचे दिवस,वगळता) उपलब्ध आहे. विहीत तारखेनंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहिरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये.
- अपुर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.
- अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द करण्यात येईल.
- अर्ज स्विकारण्याची तारीख 08 जुन, 2023 ते 22 जुन, 2023 रोजी सांयकाळी 05.00 वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळुन)
- अर्जाची छाननी दिनांक 23 जुन, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) येथे करण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादीची प्रसिध्दी त्याच दिवशी तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) यांचे नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
- अर्जा सोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
PDF जाहिरात – https://shorturl.at/apv07
कोतवाल भरती बद्दल नवीन शासन अपडेट | Kotwal Bharti 2023
मुंबई | नवीन अपडेट नुसार आता कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे. सज्जा तेथे कोतवाल नेमण्याचा तसेच त्यांच्या मानधन वाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने तलाठ्यांचे सहाय्यक असलेले कोतवाल गावोगावी मानाचे पद झाली आहे.
कोतवाल अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही तथापि शासनाने आता कोतवालांच्या भरतीसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून आरक्षण कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्याचाही नवा निकष लावला आहे.
राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हे अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून, शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे ७ मे १९५९ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण ठरवले आहे.
त्यामुळेच यापुढे कोतवालांची पदे भरताना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांची आणि १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार निवड आता करण्यात येणार आहे.
कोतवाल भरती बद्दल नवीन शासन निर्णय प्रकाशित, जाणून घ्या भरतीसंदर्भातील महत्वाचा बदल | Kotwal Bharti 2023
कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. (Kotwal Bharti 2023)
राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग (Kotwal Bharti 2023) हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा/मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. (Kotwal Bharti 2023)
सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.