मुंबई | राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त (Krushi Vibhag Recruitment) विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06 एप्रिल 2023 पासून दिनांक 30 एप्रिल 2023 (मुदतवाढ) या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – लघुटंकलेखक, लघुलेखक (Krushi Vibhag Recruitment)
पदसंख्या – ६० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क –
अमागास – रु. 720/-
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे (Krushi Vibhag Recruitment)
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023 (मुदतवाढ)
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/anoK4
शैक्षणिक पात्रता –
लघुटंकलेखक – 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (Krushi Vibhag Recruitment)
2. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वेतनश्रेणी –
लघुटंकलेखक – S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) – S-14:38600- 122800 (सुधारित – S-15: 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. (Krushi Vibhag Recruitment)
लघुलेखक (उच्च श्रेणी) – S-15 : 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते