KVS Recruitment | केंद्रीय विद्यालय लोणावळा अंतर्गत रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना केंद्रीय विद्यालय लोणावळा (KVS Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला, विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून विविध रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील. विद्यालयात संबंधित मुलाखतीच्या दिवशी 11:00 वाजेपर्यंत नोंदणी केली जाईल. (KVS Recruitment) सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या lonavala.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

मुलाखतीला उमेदवारांनी मूळ आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीचा एक संच आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत बाळगणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटlonavala.kvs.ac.in (KVS Recruitment)
PDF जाहिरातhttps://shorturl.at/ivGT7

Recent Articles