MADC Recruitment | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई (MADC Recruitment) अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

या पदभरती अंतर्गत “वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) आणि वरिष्ठ लेखा लिपिक” पदाच्या 04 रिक्त जागा (MADC Recruitment) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.

या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना शिर्डी/ मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई- 400005 या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ व्यवस्थापक –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीची पात्रता आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्य.

वरिष्ठ लेखा लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी, किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी (M.com), संगणक ज्ञान (MS-CIT) आवश्यक.

PDF जाहिरात – https://workmore.in/MADC/Recruitment/pdf
अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org

Recent Articles