वनविभागात 2,412 रिक्त जागांची भरती; लघुलेखक, वनरक्षक, लेखापाल सह विविध पदे | Mahaforest Recruitment 2023

मुंबई | वन विभागाने तब्बल 2,412 पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली असून यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भरती अंतर्गत लोकपाल पदाच्या 129 जागा, सर्वेक्षण पदाच्या 86 जागा, लघुलेखक पदाच्या 13+23 जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या 8 जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या 8+5 जागा आणि वनरक्षक पदाच्या 2138 जागा अशा एकूण 2412 पदांसाठी हि भरती प्रक्रिया होत आहे. (Mahaforest Recruitment 2023)

वन विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज 10 जून 2023 पासून सुरु होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वनविभागाच्या Mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या वेगवेगळ्या चारही पदांच्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात. खाली देखील याची अधिकृत लिंक दिलेली आहे. (Mahaforest Recruitment 2023)

MAHAFOREST RECRUITMENT 2023

image 13

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. राखीव प्रवर्गाना वयातील सवलतीची अट लागू.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

image 14

वन विभाग शारीरिक क्षमता आणि माहिती 

image 15

Recent Articles