महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात तब्बल ६१७ जागा रिक्त! Mahakosh Bharti 2024
मुंबई | राज्यातील विविध विभागांत ७५ हजार जागांसाठी भरती (Mahakosh Bharti 2024) करण्यात येणार असून, लेखा व कोषागार विभागातील गट क पदांचाही यात समावेश आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच अपेक्षित आहे. यासाठी ऑक्टोबर २०२३ ला जाहिरात काढायची होती; पण दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला नसल्याने लेखा व कोषागार विभागातील ६१७ पदांसाठीची भरती रखडली आहे.
कनिष्ठ लेखापाल पदाच्या रिक्त जागांसाठी तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत. विभागनिहाय कनिष्ठ लेखापाल पदाच्या ६१७ जागा भरण्यासंबंधीची कार्यवाही अजूनही प्रलंबित आहे. वित्त विभागाने दहा महिन्यांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे सहसंचालकांना सूचित केले होते; परंतु आजपर्यंत त्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही.
राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण, पुणे, अमरावती विभागात भरतीसंबंधाने हालचाली सुरू असल्या तरी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात कुठलीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजागारांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.
विभागनिहाय कनिष्ठ लेखापालाच्या जागा लेखा व कोषागार विभागात विभागनिहाय भरती करण्यात येत असलेल्या रिक्त जागा अशा-
कोकण विभाग १७८,
पुणे विभाग ६६,
नाशिक ३९,
छत्रपती संभाजीनगर ३६,
अमरावती ४७,
नागपूर ५८