पुणे | महाप्रीत (महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) – विविध रिक्त पदांसाठी भरती (MAHAPREIT Recruitment) अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 19 मे 2023 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीकरिता कृपया https://mahapreit.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
महाप्रित कंपनीसाठी महाव्यवस्थापक (सौर उर्जा प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO Project), सहाय्यक अभियंता व लेखा सहाय्यक पदावर करार पध्दतीने नियुक्तीसाठीची सूचना महाप्रितकडून जारी करण्यात आली आहे. (MAHAPREIT Recruitment)
कंपनी अंतर्गत नविनीकरणीय ऊर्जा, विद्युत वाहने भारण स्थानके, ऊर्जा लेखापरीक्षण, रस्ते पायाभूत सुविधा, स्वस्त घरे, माहिती तंत्रज्ञानामधील नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स, वातावरण बदल, कृषी प्रकिया मूल्य साखळी इ. विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
महाप्रित कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाकरीता
(1) महाव्यवस्थापक (सौर उर्जा प्रकल्प),
(2) महाव्यवस्थापक (ESCO Project),
(3) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स)
(4) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) तसेच
महाप्रित कंपनीच्या मुंबईतील कार्यालयाकरीता लेखा सहाय्यक या पदांसाठी 1 वर्ष कालावधीकरीता करार पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरतीसाठी उमेदवारांनी संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051 या पत्यावर अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात – https://workmore.in/mahapreit/pdf
अर्ज नमुना – https://mahapreit/application
अधिकृत लिंक – mahapreit.in