अंगणवाडी सेविका भरती; २७ जून पर्यंत अर्ज करण्याची संधी | Maharashtra Anganwadi Bharti 2023

जळगाव | एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय जळगाव मार्फत ६८ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता चव्हाण आणि साधना कापडणी यांनी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिली आहे.

बालविकास सेवा योजना प्रकल्प एकमध्ये २६ गावांसाठी २७ व प्रकल्प दोनमध्ये ३० गावांसाठी ४१ महिला मदतनीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी येत्या बुधवारपासून (ता. १४) ते २७ जून दरम्यान शासकीय सुटी वगळून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत कार्यालयात अर्ज विक्री होणार आहेत. भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयोमर्यादेची अट १८ ते ३५ अशी असणार आहे, तर विधवा उमेदवारास वयोमर्यादा ४० आहे.

प्रकल्प एक कार्यालय अंतर्गत राजमाने, शिदवाडी, ढोमणे, पोहरे, भवाळी, खेडी खुर्द, बहाळ, कढरे, सुंदरनगर, विसापूर, दरेगाव, चिंचगव्हाण, भोरस बुद्रुक, दसेगाव, इच्छापूर, रहिपुरी, तामसवाडी, सेवानगर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, माळशेवगे, मांदूरणे, पिंपळवाड प्लॉट, शिरसगाव या गावांसाठी प्रत्येकी एक जागा तर मेहुणबारे येथे दोन जागांसाठी भरती आहे. 

प्रकल्प दोनसाठी चंडिकावाडी, मुंदखेडा बुद्रुक, मुंदखेडा खुर्द, पाटणा, पातोंडा, गणपूर, ओझर, शिवापूर, वलठाण पाटे, आंबेहोळ, सांगवी, रांजणगाव, रोकडे, तळेगाव, खरजई, न्हावे, तरवाडे, वडाळा, उंबरखेड, आडगाव, परशुराम नगर, टाकळी प्र दे, हातले, हिंगोणे खुर्द, वाघले, वाकडी, सोनगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी एक जागा ते टाकळी प्र. चा., गोरखपूर, देवळी या गावांना प्रत्येकी दोन जागा अशा ३० गावांत ४१ पदांची भरती होणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.


मुंबई | राज्यातील अंगणवाडी सेविका भरतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून यामुळे रखडलेली अंगणवाडी (Maharashtra Anganwadi Bharti 2023) पदभरती सुरळीत होणार आहे. राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे.

मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Maharashtra Anganwadi Bharti 2023)

भरती संदर्भात सूचना मिळाल्यानंतर, त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रतेबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला आहे.

परंतु अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी २४ मार्च रोजी झाली. त्यावेळी न्यायालयाने सकृतदर्शनी या आक्षेपांचा विचार करून १७ एप्रिल २३ पर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती.

याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याआधीची मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संघटनानी का घेतला होता आक्षेप (Maharashtra Anganwadi Bharti 2023)

पूर्वी दहावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु, शासनाच्या नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या नव्या निकषालाच संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले. म्हणूनच पदोन्नतीच्या आधीच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Recent Articles