मुंबई | राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील अनेक उमेदवार या भरतीची वाट पहात होते. या पदभरती अंतर्गत 7 वी ते पदवीधरांना मुलाखतीव्दारे निवडीच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे. (Maharashtra Excise Department Recruitment 2023)
या पदभरती अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 512 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. (Maharashtra Excise Department Recruitment 2023)
या पदभरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 7वी, दहावी, टायपिंग अशी असून काही पदांसाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे.
PDF जाहिरात | shorturl.at/dey45 |
ऑनलाईन नोंदणी करा | shorturl.at/wedE6 |
ऑनलाईन अर्ज करा | shorturl.at/ytruy |
महत्वाचे
- वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.
- प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
- पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे.
- तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.