नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राज्य उत्पादन शुल्क विभाग (Maharashtra Excise Department Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 512 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे. (Maharashtra Excise Department Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
लघुलेखक (निम्नश्रेणी) –
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखक –
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवान, राज्य उत्पादन शुल्क –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क –
१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशी –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
वेतनश्रेणी –
लघुलेखक (निम्नश्रेणी) – S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक – S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क – S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते (Maharashtra Excise Department Recruitment)
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी – S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/dey45