Career

महिना 92 हजार पगाराची सरकारी नोकरी; महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची मोठी भरती | Maharashtra Govt. Job 2025

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग, प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांसाठी मोठी भरती (Maharashtra Govt. Job 2025) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पुणे प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) [वेतनस्तर एस-10-29200-92300 या वेतनश्रेणीत] या संवर्गातील रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखापाल (गट-क) – Maharashtra Govt. Job 2025
  • पदसंख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे 
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला) प्रवर्ग – 1000/-
    • राखीव प्रवर्ग- 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mahakosh.maharashtra.gov.in/

शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल (गट-क)(1)सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी
(2) तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

वेतन – Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लेखापाल (गट-क)pay scale S-10-29200-92300

अर्ज कसा करावा

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. अर्ज 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वेळापत्रक –  Mahakosh  Lekhapal Bharti 2024

कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
1. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधीदि. 31.12.2024 रोजी 11:00 वाजल्यापासून दि. 30.01.2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत
2. ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदि. 30.01.2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत
3. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणेयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल
4. ऑनलाईन परीक्षेचा दिनांकयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल
PDF जाहिरातMahakosh Junior Accountant Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराMahakosh Junior Accountant Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

Back to top button