महिना 40 हजार कमवा; पात्रता फक्त पदवी | MTDC Recruitment

मुंबई | राज्यातील शिक्षित तरूण तरूणींना प्रशासकीय सेवेचा अनुभव मिळावा या उद्देशाने त्यांना काही महिन्यांच्या कालावधीकरिता विविध विभागांमध्ये सामावून घेतले जाते. शासनाच्या अशाच महत्वाच्या विभागात पदवीधर तरूण-तरूणींना संधी उपलब्ध असून निवड झालेल्या उमेदवारांना महिना 40 हजार मानधन दिले जाणार आहे. आवश्यक लिंक खाली दिलेल्या आहेत.

राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (MTDC Recruitment) फेलोशिप (MTDC Fellowship Program 2023) उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची (MTDC Recruitment) संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम 2023 मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे.

समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.

फेलोशिपसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता

या उपक्रमासाठी वयोमर्यादा 21 ते 26 वर्ष निश्चित करण्यात आली असून, कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

फेलोशिपसाठी अर्ज कसा आणि कुठे कराल?

– संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
– MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 – अर्ज महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, 1 ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, 169 बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई 40020 यांना करावे.
– फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

फेलोशिप जाहिरात आवश्यक लिंक

Applications Are Invited For MTDC Fellowship Programme 2023 – 15-05-2023
Applications Are Invited For 3/6/11 Months Internship AT MTDC – 15-05-2023

फेलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपये छात्रवृत्ती आणि 5 हजार रुपये  प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

Recent Articles