खुशखबर! राज्यातील नगर परिषदां मध्ये लवकरच हजारो पदांची भरती | Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

मुंबई | राज्याच्या नगरपरिषदांमधील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर (mahadma.maharashtra.gov.in) “नगरपरिषद संवर्ग कर्मचारी भरती 2023” ची नवीन लिंक उपलब्ध झाली आहे.

या नवीन लिंक वर लवकरच जाहिरात आणि अर्ज उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) जारी केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी इच्छूक आहेत ते महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात.

Govt Job

Recent Articles