मुंबई | महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना “केंद्रप्रमुख” पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३‘ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.
प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुन २०२३ आहे.
केंद्रप्रमुख
1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.
PDF जाहिरात | https://shorturl.at/adwHJ |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/orK37 |
अधिकृत वेबसाईट | www.mscepune.in |
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 15/06/2023 रोजी पर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
निवड होणाऱ्या शिक्षकांना २७ हजार रुपये मानधन..
अपुऱ्या शिक्षकांच्या समस्येवर तोडगा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मानधनावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. २०९ जागांसाठी दीनदयाळ उपाध्याय शाळेत गुरुवारी एकूण १६४२ अर्ज स्वीकारण्यात आले. दरम्यान, माध्यमिक महापालिका शाळांसाठी सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांच्या जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रत्येकी सहा महिन्यांसाठी असणाऱ्या जागांवर निवड होणाऱ्या शिक्षकांना २७ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अर्जाची छाननी सुरू आहे.
मानधन तत्त्वावर शिक्षक भरतीची कारणे….
■ जुने शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्येत वाढ
■ शासनाकडून नवीन भरतीकडे कानाडोळा करण्यात आल्याने शहरातील शिक्षकांची रिक्त पदे २०० पेक्षा जास्त
■ रिक्त पदांमुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम
■ प्रत्यक्ष अध्यापन सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षकांची उणीव भासत आहे
परजिल्ह्यातून उमेदवार
बीड, अहमदनगर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यातून शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी सकाळपासून गर्दी केली होती. शिक्षण विभागाने दिलेल्या शिक्षक भरती जाहिरातीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने उमेदवार उपस्थित होते. अर्ज स्वीकृती, त्याची छाननी आणि पडताळणी नंतर शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशीच नवे शिक्षक शाळांना मिळतील, असा प्रयत्न आहे.
– विजय थोरात, सहायक आयुक्त