मुंबई | राज्य शासनाने तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढीचा नवीन GR प्रकाशित केला आहे. सदर जीआर नुसार तलाठी संवर्गाच्या एकूण ४०५९ अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आली आहे. (Talathi Bharti 2023)
संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी ८५७५ पदे स्थायी असून, उर्वरित ४०५९ पदे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०५९ अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांनी संदर्भ क्र. ४ वरील शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.
Talathi Bharti 2023 | रखडलेल्या तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट; जाणून घ्या
मुंबई | गेली अनेक दिवस चर्चेत असेलली आणि सातत्याने रखडलेली तलाठी भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याच्या हालचाली दिसत आहेत. सदर पदभरतीची कार्यवाही तातडीने करणेकामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. ४/५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली आहे.
यासंदर्भात माहीती प्रकाशित करण्यात आली असून, यामध्ये उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे (जिल्हा निहाय व विभाग निहाय), परिक्षेची तारीख निश्चित करणे, पदभरतीची कार्यपध्दती तसेच अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.बाबत गुरुवार, दि. ४/५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली आहे. तरी सदर आढावा बैठकीसाठी आपण आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित रहावे अशी सूचना प्रशासकीय यंत्रणांना करण्यात आली आहे. बैठकीची लिंक आपणास स्वतंत्ररित्या पाठविण्यात येईल असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
मुंबई | महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. माहिती अधिकाराला उत्तर देताना (Talathi Bharti 2023) ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. याद्वारे 4 हजार 681 जागा भरण्यात येणार आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया केंव्हा पार पडेल याबद्दल स्पष्टता नाही. परंतु, सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर (Talathi Bharti 2023) प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरली जातील.
पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यपालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल 11 जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले.
त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर 2019 साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.
2023 मध्ये प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.
त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह 17 संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती
■ 50 टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच 100 टक्के तलाठी पदे भरणार
■ 25 ते 50 टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : 50 टक्के पदांची संधी (Talathi Bharti 2023)
■ 25 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : 25 टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील. एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.