Talathi Bharti 2023 | तलाठी भरती प्रारूप जाहिरात बोगस

मुंबई | तलाठी भरतीच्या (Talathi Bharti 2023) प्रतीक्षेत असलेल्या उमेवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाची प्रारूप जाहिरात सध्या तयार झाली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण 4625 जागांसाठी तलाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. महाभरती ने याबाबत माहिती दिली आहे. परंतु ही जाहिरात बोगस असल्याचे सांगितले जात असून अशी कोणतीही जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द झालेली नाही.

या बोगस जाहिरातीत तलाठी भरतीची लेखी परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या दरम्यान होणार असल्याचे समजते. या संदर्भातील सुधारित अधिकृत तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल. तसेच या भरती साठी परीक्षा शुल्क 1000/- IBPS पद्धतीनुसार असण्याची शक्यता आहे. असेही म्हणटले आहे.

प्रस्तृत परीक्षेमधून भरावयाच्या तलाठी संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट – 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.
३. परिक्षा वार व दिनांक :- (दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाईल.
३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त, व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

सदर प्रारूप जाहिरात बोगस असल्याने तलाठी भरतीबाबत उमेदवारांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

image 4

Talathi Bharti 2023 : नवीन पदे भरण्याबाबत नवीन परिपत्रक जाहीर

मुंबई (27 May 2023) | राज्यातील रखडलेली तलाठी भरती (Talathi Bharti 2023) कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले असताना, नुकतचं 26 मे 2023 रोजी राज्य शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार नवनिर्मित 518 मंडल अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

image 65

राज्यभरातील रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तलाठी भरतीसाठी TCS कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे मात्र, या बैठकीनंतर भरती केव्हा होणार याविषयी सरकारकडून ठोस असे काहीच झालेले नाही. त्यानुळे केवळ घोषणाच होत असल्याचे चित्र असून प्रत्यक्षात तलाठी पदासाठी जाहिरात कधी निघणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.  


तलाठी भरती नवीन अपडेट- नव्याने महसूल मंडळ, तलाठी सजांची भर – Talathi Bharti 2023

मुंबई | राज्यात नव्याने २०२ तलाठी सजा आणि ३४ महसूल मंडळ कार्यालये मंजूर झाली आहेत. कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे तलाठी संवर्ग पदाच्या संख्येत २०२ तर महसूल मंडलाधिकारी संवर्गाच्या ३४ पदांची नव्याने भर पडली आहे. (Talathi Bharti 2023)

तलाठी सजाची संख्या आता ७८८ तर मंडळ कार्यालयांची संख्या १३१ झाली आहे. कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे तलाठी संवर्ग पदाच्या संख्येत २०२ तर महसूल मंडलाधिकारी संवर्गाच्या ३४ पदांची नव्याने भर पडली आहे.

त्यामुळे शुक्रवारी ५१ तलाठ्यांना मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. तलाठी संवर्गाची पदे थेट सरळ- सेवा भरतीने भरावयाची आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमाबंदी विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. जिल्ह्यात तलाठी सजा आणि मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे महसुली कामकाजाला वेग येणार आहे.

राज्य शासनाने २०१७-१८ मध्ये तलाठी सजांची पुनर्रचना केली. त्यानुसार राज्यात ३ हजार १६५ नवीन सजा निर्माण करण्यात आले. ६ तलाठी सजांमागे एक महसूल मंडळ यानुसार नवीन ५२८ महसूल मंडळे निर्माण करण्यात आले. नगर जिल्ह्यासाठी किती तलाठी सजा आणि महसूल मंडळ कार्यालयांची आवश्यकता आहे. याचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे मागविला होता. त्यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यासाठी वाढीव २०२ तलाठी सजा आणि ३४ महसूल मंडळ कार्यालये मंजूर केले आहेत.

नगर तालुक्यात १५ सजा आणि १ महसूल मंडळ, अकोले तालुक्यात २१ सजा व ४ मंडल कार्यालयांची वाढ झाली. तालुकानिहाय कमीत कमी ६ व जास्तीत जास्त २३ सजांची तर कमीत कमी १ तर जास्तीत जास्त ४ महसूल मंडळाची वाढ झालेली आहे. तलाठी व महसूल मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्याने तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडील कामांचा बोजा कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे.


पुढील तीन महिन्यांत ४ हजार २०० तलाठींची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यात नाशिक विभागातील ५०० तलाठ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदांम‌ध्ये साधारणत: ४,२०० तलाठी पदांचा समावेश आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा होती. पण पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यास सांगितले आहे. भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठीच विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. TCS व IBPS कंपन्यांमार्फत भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांनी संदर्भ क्र. ४ वरील शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.


महसूल विभागात 13 हजार 536 रिक्त पदांची भरती, लिपिक, तलाठी, नायब तहसिलदार सह अनेक पदे | Mahasul Vibhag Bharti 2023

राज्याच्या महसूल विभागात लवकरच मोठ्या प्रमाणात भरती (Mahasul vibhag bharti) केली जाणार आहे. महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.

तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे.

महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. (Mahasul vibhag bharti) पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.

मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.

अपर जिल्हाधिकारी – ३१
उपजिल्हाधिकारी – १६
तहसीलदार – ६६
नायब तहसीलदार – ४५७
तलाठी – ५,०३० 
अधीक्षक – १२
उपअधीक्षक भूमी अभिलेख – ९१
मद्रांक निरीक्षक – १५ (Mahsul vibhag bharti)
दुय्यम निबंधक – १८२
मंडल अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, लघुटंकलेखक – २,५७५
अराजपत्रित लघुलेखक – १५३
कनिष्ठ लिपिक – ५३२
पदसमूह ४ – १,८१९
शिपाई – २,३७५

Recent Articles