Mahavitaran Recruitment | १० वी, ITI उत्तीर्णांना महावितरण अंतर्गत नोकरीची संधी; ३२० रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर (Mahavitaran Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (Mahavitaran Recruitment) एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे. अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
लाईनमन – १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण (Mahavitaran Recruitment)
संगणक ऑपरेटर – कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/forsH

Recent Articles