Career

महावितरण ‘विद्युत सहाय्यक भरती’ मुदतवाढ; SEBC उमेदवारांसाठी फॉर्म भरण्याची लिंक पुन्हा सुरू | Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Limited has invited application for the posts of “Electrical Assistant”. There are total of 5347 vacancies are available. Candidates age should be between 18 to 27 years. The application is to be done online. Online application form are now available on company website. The official website of MahaVitaran is www.mahadiscom.in. However, most of the candidates have requested for extension of time for submission of online application. Reason, the last date of submission of online application for the said post is being extended till 16th August 2024. The web link to apply online, vacancies, educational qualification, terms and conditions, detailed advertisements are available on the company’s website www.mahadiscom.in and eligible candidates should apply online.

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मोठी भरती (Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट  2024 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९/१२/२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच यायावत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम- २०२४ दि. २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि.२७.०२.२०२४ अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापीत जाहिरातीकरीता लागू आहेत.

उक्त जाहिरातीकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरीता आरक्षण निश्चित करुन सुधारीत रिक्त पदांचा तपशील दि. २१.०६.२०२४ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून (EWS) अर्ज केलेल्या उमेदवारांनी एसईवीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शक सूचनाही प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या.

सबब, ज्या एसईबीसी उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांचेसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातीं.3 (SEBC) प्रवर्गाचा विकल्प सादर करणेवावची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सदर उमेदवारांनी दि. १७.०७.२०२४ पर्यंत विकल्प सादर करावेत. तसेच याद्वारे कळविण्यात येते की, वयाधिकामुळे जे एसईबीसी उमेदवार अर्ज करु शकले नाहीत त्यांचेकरीताही लवकरच स्वतंत्र वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.

  • पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
  • पदसंख्या – 5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट  2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
पदाचे नाववेतनश्रेणी
विद्युत सहाय्यकप्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
PDF जाहिरातMahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Back to top button