मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत राज्यामध्ये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी करण्यात येत असून सदर अधिनियमाच्या कलम ५४ अन्वये नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
सदर समितीवर बाल संरक्षण तज्ञ, स्वंयसेवी संघटनेचा प्रतिनिधी आणि नामांकित सामाजिक कार्यकर्ता अशा एकुण तीन “अशासकिय सदस्यांची” निवड करण्यासाठी समाजातील बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेल्यासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत.
इच्छुक पात्र व्यक्तींनी आपले अर्ज आयुक्त, महिला व बाल विकास, २८, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ या पत्यावर ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाचे आत (28 जुन 2023) आयुक्तालयास प्राप्त होतील या दृष्टीने पाठविण्यात यावेत.
विहित तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच टपाल खात्याकडून अर्ज प्राप्त होण्यास विलंब झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सदर अर्जाचा नियुक्ती करीता विचार केला जाणार नाही.
१. अर्जदार व्यक्ति किमान पदवीधर असावा.
२. बालहक्क, काळजी, संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
३. अर्जदार व्यक्तिचे वय ३५ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नसावे.
४. अशासकिय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून तीन वर्षाचा राहील.
PDF जाहिरात – https://shorturl.at/evx12
अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.com
अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.com
www.maharashtra.gov.in