मुंबई | मायक्रोसॉफ्ट ही जगभरातील आघाडीच्या आयटी टेक कंपन्यांपैकी एक आहे. (Microsoft Recruitment) फ्रेशर असो वा अनुभवी, प्रत्येक आयटी प्रोफेशनल मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणं हे ड्रीम असतं. जर तुम्ही त्यापैकी एक असाल आणि तुम्हाला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी हवी असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या संदर्भात ‘content.techgig’ ने वृत्त दिलंय.
- पदाचे नाव – ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers)
- शैक्षणिक पात्रता – या पदभरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाविषयी ज्ञान असणं विषयक आहे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
भूमिका आणि जबाबदाऱ्या –
हाय परफॉर्मिंग इंजिनीअर्सची टीम बनवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेणं.
फर्मवेअर आर्किटेक्चर आणि डेव्हलपमेंटद्वारे मायक्रोआर्किटेक्चर डिझाईनपासून प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या सर्व टप्प्यांमध्ये तुमचा सहभाग असेल.
उत्तम इंजिनीअरींग प्लॅन्स, बॉटम-अप शेड्युल, ड्राईव्ह ट्रेड-ऑफ आणि टॉप लेव्हल शेड्युल तयार करून चांगल्या गुणवत्तेसह काम पूर्ण करण्यासाठी काम करावं लागेल.
कम्प्युटर सायन्समध्ये एमएस किंवा इंजिनीअरिंग किंवा त्या लेव्हलचा अनुभव.
C, C, किंवा Rust मध्ये सिद्ध आणि प्रात्यक्षिक स्कील्स.
समस्या सोडवणं, डीबगिंग आणि समस्या निवारण स्कील्स, अॅडव्हान्स्ड डिझाईन आणि डेव्हलपमेंट स्कील्स.
लो लेव्हल फर्मवेअर डेव्हलपमेंटच्या अनुभवासह बेअर मेटल/आरटीओएस, PCIe, I2C, eMMC, SPI, USB आणि UARTs तसेच मेमरी मॅनेजमेंट, शेड्युलिंग, इंटरप्ट्स आणि मल्टी-थ्रेडिंग सारख्या पेरिफेरल्ससाठी ड्रायव्हर्सचा अनुभव. (Microsoft Recruitment)
डिझायनिंग व लार्ज स्केल एम्बेडेड सॉफ्टवेअर सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी 10 वर्षांचा अनुभव.
इंजिनीअर्सची टीम मॅनेज व लीड करण्याचा 5 वर्षांचा अनुभव.
SoC आर्किटेक्चर आणि डिझाईनच्या सुरुवातीच्या संकल्पनेपासून ते फायनल प्रॉडक्ट शिपिंगपर्यंत काम करण्याचा अनुभव. (Microsoft Recruitment)