MIDC Recruitment | एमआयडीसी अंतर्गत लघुलेखक व इतर पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या पत्यावर सादर करावेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील (MIDC Recruitment) कामकाज जलदगतीने होणेकरीता शासकीय / निमशासकीय / महामंडळाच्या सेवेतून खालील नमूद पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार पध्दतीने विवक्षित कामासाठी / प्रशासकीय कामासाठी नेमणूक करण्यासाठी नामिकासूची (Panel) तयार करणे आहे. यास्तव “तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)” पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर अर्ज दिनांक १७/०४/२०२३ ते दिनांक २४/०४/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा gmhrd@midcindia.org या ईमेलवर सादर करण्यात यावेत.

पदाचे नाव – तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)
पदसंख्या – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई 
वयोमर्यादा – 58 ते 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (MIDC Recruitment)

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org (MIDC Recruitment)
PDF जाहिरातhttps://shorturl.at/iNUV5

शैक्षणिक पात्रता –
तहसिलदार – तहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
नायब तहसिलदार – नायब तहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (वि/यां) – सहाय्यक अभियंता (वि/यां) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापक – क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक – सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक – सहाय्यक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव (MIDC Recruitment)
लघुलेखक (उ.श्रे.) – लघुलेखक (उ.श्रे.) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

image 13

Recent Articles