मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरीची उत्तम संधी; 29 रिक्त जागांसाठी भरती | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 आणि 12 मे 2023 (पदांनुसार) आहे.

या पदभरती अंतर्गत “शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक), मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, पशुवैद्यक” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक), मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, पशुवैद्यक पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 19 मे 2023 आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मा.स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प), जि.ठाणे 401 101 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत तसेच मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

शैक्षणिक पात्रता
शिक्षक (प्राथमिक) – 12th Science with D.Ed.
शिक्षक (माध्यमिक) – B.Sc./ B.A/ B.Ed.
मॅमोग्राफी तंत्रज्ञ – B.Sc. in Paramedical Technology (Radiography) Knowledge of Marathi is essential.
बायोमेडिकल अभियंता – Degree in Biomedical Engineer
पशुवैद्यक – B.V.Sc. & A.H. आणि MCVC यांचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

PDF जाहिरात (शिक्षक)https://MBMC/advt1
PDF जाहिरात (मॅमोग्राफी तंत्रज्ञ)https://MBMC/advt2
PDF जाहिरात (बायोमेडिकल अभियंता)https://MBMC/advt3
PDF जाहिरात (पशुवैद्यक)https://MBMC/advt4

Recent Articles