मुंबई | राज्याच्या समाज कल्याण विभागातील भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. समाज कल्याण विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Bharti 2023) अंतर्गत “गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष” पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
समाज कल्याण विभागाच्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 15 मे 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवारांनी त्यासाठी दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी. (MPSC Bharti 2023)
या पदभरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. ते खालीलप्रमाणे आहे.
- अर्ज शुल्क –
- गृह्प्रमुख, संचालक (आयुष)
- अराखीव (खुला) – रु. 719/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
- सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी
- अराखीव (खुला) – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु. 294/-
- गृह्प्रमुख, संचालक (आयुष)
शैक्षणिक पात्रता
गृहप्रमुख –
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी; किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षणाची पदवी किंवा समकक्ष पात्रता.
सहायक आयुक्त –
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी; किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचे सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासनातील दोन वर्षांचा पदव्युत्तर पदविका किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून द्वितीय श्रेणीचा पदव्युत्तर पदविका किंवा सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासनातील पदवी.
समाजकल्याण अधिकारी –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मागासवर्गीय असल्यास, आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्याची पदवी, तसेच मराठीचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक.
आयुष संचालक –
महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B, किंवा C मध्ये नमूद केलेल्या पात्रतेपैकी एक असणे.
इंग्रजी आणि हिंदीचे चांगले ज्ञान असावे.
या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराने नियुक्तीमध्ये सामील होण्यापूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, 1961 (Mah. XXVIII of 1961) अंतर्गत स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे, जर तो आधीच नोंदणीकृत नसेल.
पदभरतीसाठी आवश्यक लिंक आणि PDF जाहिराती
PDF जाहिरात (गृहप्रमुख) | https://HomeHead.pdf |
PDF जाहिरात (सहायक आयुक्त) | https://Assistant Commissioner.pdf |
PDF जाहिरात (समाज कल्याण अधिकारी) | https://Social Welfare Officer.pdf |
PDF जाहिरात (संचालक) | https://Director-AYUSH.pdf |
ऑनलाईन अर्ज करा (१५ मे २०२३ पासून सुरु होतील) | online.registration/candidate |
अधिकृत वेबसाईट | mpsc.gov.in |