MPSC : कौशल्य चाचणी परीक्षा पुन्हा द्यावी लागणार; विद्यार्थांच्यात संतापाची लाट | MPSC Recruitment

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Recruitment) गट-क अंतर्गत कर सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी सात एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. मात्र या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. काही उमेदवारांना आलेल्या तांत्रिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मात्र एमपीएससीने सरसकट सर्व उमेदवारांसाठी बुधवारी (ता.31) पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे.

आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा परीक्षा देणार नाही, अशी भूमिका परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी घेतली होती. ज्यांना कोणाला तांत्रिक अडचण आली असेल त्यांची व्यवस्थित पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र एमपीएससीने उमेदवारांच्या मागणीला न जुमानता पुन्हा एकदा परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमधून संतापाच्या भावना व्यक्त होत आहे.

आयोगाने अट्टहास सोडावा

ठराविक विद्यार्थ्यांसाठी सरसकट सर्व विद्यार्थांची पुन्ही परिक्षा घेणे विद्यार्थांना पटलेले नाही. त्यामुळे परीक्षा पुन्हा न देण्याच्या उमेदवारांच्या भूमिकेला काही राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शवत आयोगाला पत्र लिहले आहे. मात्र आयोगाने ताठर भूमिका घेत विद्यार्थी आणि नेत्यांची मागणी धुडकावून लावली आहे.

गेल्या वर्षी गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती व काही दिवसांपूर्वीच परीक्षेचा कौशल्य विकास चाचणीचा शेवटचा टप्पा पार पडला होता. कट -क अंतर्गत सहाय्यक पदाच्या 285 तर लिपिक व टंकलेखक पदांसाठी 1 हजार 77 जागांसाठी आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली होती.

Recent Articles