MSC बँक अंतर्गत लिपिक पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | MSC Bank Job

मुंबई | बॅंकिग क्षेत्रात लिपिक पदासाठी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील बँकांमध्ये “ट्रेनी ज्युनिअर क्लार्क, ट्रेनी क्लार्क व ट्रेनी सिनिअर क्लार्क” या पदांच्या (MSC Bank Job) एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि., जव्हार या अग्रगण्य नागरी सहकारी बँकांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 (मुदतवाढ) आहे. (MSC Bank Job)

या पदभरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400001 असा आहे. (MSC Bank Job)

शैक्षणिक पात्रता –
किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.

बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

महत्वाचे
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
लेखी परीक्षेत ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांनाच मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा. जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे.
परीक्षेचे कॉल लेटर्स, मुलाखतीचे कॉल लेटर्स तसेच इतर पत्रव्यवहार (असल्यास) इ. उमेद्वारांना त्यांच्या अर्जात दिलेल्या ई-मेल आयडीवर केवळ ई-मेलद्वारेच पाठविण्यात येतील.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/eyzSZ
PDF जाहिरात (शैक्षणिक पात्रता)https://shorturl.at/wE068
अर्ज नमुना – https://shorturl.at/lrwFL
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/nuFUV
अधिकृत वेबसाईटwww.mscbank.com

Recent Articles