MSPHC Recruitment | MSPHC अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित अंतर्गत नोकरीची (MSPHC Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत कार्यकारी अभियंता, प्रकल्प अभियंता पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून विविध रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (MSPHC Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ०३ मे २०२३ पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता व्यवस्थापकीय (MSPHC Recruitment) संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक 89-89A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- 400030 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी.
2. शासकीय / निमशासकीय सेवेतील सेवा निवृत्त कार्यकारी अभियंत्यांसाठी कार्यकारी अभियंता पदावरील किमान ३ वर्षाचा अनुभव अथवा उप अभियंता पदावरील १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

प्रकल्प अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी.
2. नामांकित बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील निवासी बांधकामे तसेच, अनिवासी बांधकामांवरील प्रकल्प अभियंता पदावरील कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक.
3. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

वेतनश्रेणी –
कार्यकारी अभियंता – Rs. 65,000/-
प्रकल्प अभियंता – Rs. 40,000/-

अधिकृत वेबसाईटmsphc.org
PDF जाहिरातhttps://shorturl.at/vxV05

Recent Articles