पदवीधर उमेदवारांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी; 153+ रिक्त पदांची भरती | Mumbai University Recruitment

मुंबई | मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागांमध्ये तसेच विविध महाविद्यालयांमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरतीसाठी प्रचलित नियमानुसार आरक्षणाचे निकष लागू राहतील. (Mumbai University Recruitment)

विद्यापीठातील विविध विभाग / संस्था / केंद्र, विद्यापीठ संचालित विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय, अंबाडवे, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदूर्ग तसेच विद्यापीठ उपपरिसर ठाणे, रत्नागिरी व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड अप्लाईड सायन्सेस, कल्याण येथे शिक्षकीय पदे शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ करीता हंगामी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत. (Mumbai University Recruitment)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विविध विषयांनुसार उपलब्ध जागांचे तपशिलाप्रमाणे विहीत अर्ज शुल्क (खुला प्रवर्ग रू. ५००/- व राखीव प्रवर्ग रू.२५०/-) आणि नियम, अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत शुल्क फक्त एनईएफटीद्वारे राष्ट्रीयकृत बँकेत भरून पावती व इतर शैक्षणिक अर्हता, अनुभव यांच्या स्वसाक्षांकीत कागदपत्रांसह https://muappointment.mu.ac.in/ या ऑनलाईन लिंकवर गुरूवार दिनांक १५ जून २०२३ पर्यंत सादर करावेत. तसेच दोन प्रती आवक विभाग, रुम नंबर २५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ येथे जमा कराव्यात.

सदर जाहिरात, विहीत नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच इतर नियम, अटी, शर्ती व ऑनलाईन लिंक इत्यादी बाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/ajtKM
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/bcflN

Recent Articles