मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात NABCONS अंतर्गत “वरिष्ठ किंवा मध्यमस्तरीय सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (NABCONS Recruitment) अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदभरती अंतर्गत एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज (NABCONS Recruitment) करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी ३० एप्रिल ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. विहित तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वरील पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता कृषी आणि संबंधित विषयांमधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पहिल्या श्रेणीतून पदवीधर/किंवा पदव्युत्तर/पीएचडी किमान 55% सह. तसेच कृषी/उत्पादन/ वनीकरण/ कृषी अभियांत्रिकी/ मृदा विज्ञान/ मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी/ पर्यावरण विज्ञान/ जलविज्ञान/ पीक विज्ञान पाणलोट विकासाच्या संबंधित अनुभव किंवा किमान 55% गुणांसह सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर आणि पाणलोट विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी आणि देखरेखीचा 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | https://workmore.in.pdf |
ऑनलाईन अर्ज करा | https://nabcons/apply |
वरील पदांकरिता उमेदवारांची निवड ही मुलाखतीव्दारे केली जाईल. केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखत वैयक्तिकरित्या किंवा आवश्यकतेनुसार आभासी पध्दतीने घेतली जाईल. मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती अनिवार्यपणे सादर कराव्या लागतील, तसेच मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना आलेल्या कोणत्याही खर्चाची NABCONS द्वारे परतफेड केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.