नागपूर | नागपूर होमगार्ड अंतर्गत होमगार्ड पदांच्या एकूण 892 रिक्त जागा भरण्यात (Nagpur Home Guard Bharti Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
होमगार्ड पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव – होमगार्ड
पदसंख्या – 892 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास. (मूळ जाहिरात वाचावी.)
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो