Nagpur Mahanagarpalika Recruitment | नागपूर महापालिकेत 17,981 रिक्त जागांच्या पदभरती आकृतीबंधास मान्यता

नागपूर | नोकरीच्या शोधात असणाऱ्या नागपूर तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही आनंदाची (Nagpur Mahanagarpalika Recruitment) बातमी आहे. नागपूर महानगरपालिकेतील १७९८१ पदभरतीच्या आकृतीबंधाला नुकतीच मान्यता देण्यात आली असून, या आकृतीबंधानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रपत्र-“अ” मध्ये नमूद शासन मंजूर १३१८३ पदांसह नवनिर्मित ७५०३ पदे अशा एकूण २०६८६ पदांमधून व्यपगत करावयाची २७०५ पदे वगळून नागपूर महानगरपालिकेच्या प्रपत्र – “ई” मध्ये नमूद केल्यानुसार एकूण १७१०९ पदांना याद्वारे व संदर्भ क्र. ३ वरील शासन निर्णय क्रमांक : नामपा /२०१५/१६५२/प्र.क्र.१६६/नवि-२६ दि. १२.०५.२०१७ नुसार मंजूर अग्निशमन विभागाचे ८७२ पदे समाविष्ट करुन अशा एकूण पृष्ठ ३ पैकी २ १७९८१ पदांच्या एकत्रीत आकृतीबंधास पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. (Nagpur Mahanagarpalika Recruitment)

वरील आशयाचे नवीन परिपत्रक आज (११ मे २०२३) जाहीर झाले आहे. या नुसार भरती प्रक्रिया सुरु होण्याचे संकेत आहे. 

Recent Articles