मुंबई | देशाच्या संरक्षण दलात सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) प्रवेशासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. मात्र NDA नक्की आहे तरी काय? NDA साठी नक्की कोणते निकष आणि कोणते गुण तुमच्याकडे (Exam Pattern of NDA) आवश्यक आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी NDA ची भरती परीक्षा देतात आणि यापैकी काही लोकं देशसेवा करण्यासाठी पुढेही असतात. यापूर्वी फक्त पुरुष उमेदवार NDA ची भरती परीक्षा देण्यासाठी पात्र (Eligibility for NDA exam) होते मात्र आता महिलाही ही परीक्षा देऊ शकणार आहेत (Women will give NDA).
NDA ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते म्हणजे NDA-I आणि NDA-II. पहिली अधिसूचना जानेवारीत जारी केली जाते आणि दुसरी अधिसूचना जूनच्या आसपास येते. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलच्या आसपास आणि दुसरी सप्टेंबरच्या आसपास घेतली जाते. एनडीए अर्जामध्ये दोन भाग असतात. इच्छुक उमेदवार http://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय सेना, वायुसेना किंवा नौसेनेत भरती होण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य आहे.
भारताव्यतिरिक्त या देशाचे उमेदवार ही असतात पात्र
अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारत, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक असणं आवश्यक आहे. 01 जानेवारी 1962 पूर्वी भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी जर भारताचा अँग्रिक होऊ इच्छित असेल तर पात्र आहे. भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील पात्र आहे.
शैक्षणिक पात्रता
NDA भरती होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 पॅटर्नप्रमाणे 12 वी पास असणे आवश्यक आहे. तर वायुसेना आणि नौसेनेत भरती होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 PCM पॅटर्नचाप्रमाणे 12 वी पास.असणं आवश्यक.
NDA साठी आवश्यक शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता
उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. ‘वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त’ म्हणजेच उमेदवारांकडे चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कोणत्याही रोग /सिंड्रोम /अपंगत्वापासून मुक्त असणं आवश्यक आहे. तसेच कोणत्याही भूभाग, हवामानात, समुद्र आणि हवेमध्ये लष्करी कर्तव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कमी पडणार नाही याची काळजी उमेदवारांनी घेणं आवश्यक आहे.
NDA वयोमर्यादा
केवळ वयवर्षे 16½ ते 19½ या वयोगटातील पुरुष आणि महिलाही NDAमध्ये सामील होऊ शकतात.
NDA परीक्षेचं स्वरूप
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश आहे. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. ज्यात गणित (Mathematics) आणि सामान्य क्षमता चाचणी (The General Ability Test) हे पेपर असतात तर यानंतरर हे पेपर पास करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
कोल्हापूर | संरक्षण दलामध्ये नोकरी मिळवण्याचे अनेकजण स्वप्न बाळगून असतात. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची फार गरज असते. हीच बाब ध्यानात घेत दै. ‘पुढारी’ आणि नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA Career Guidance ) मधील करिअर संधी’ या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता दै. ‘पुढारी’ आणि नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA Career Guidance ) मधील करिअर संधी’ शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.
“या कार्यशाळेत लेफ्ट. कर्नल समीर बोरस्कर (निवृत्त) आणि कमांडर सचिन जोग (निवृत्त) हे विद्यार्थ्यांना सैन्यात अधिकारी होण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी ‘एनडीए’मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. ‘एनडीए’तील परीक्षेच्या माध्यमातून संरक्षण दलात उच्चपदस्थ अधिकारी होऊन देशसेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्या ‘एनडीए’ परीक्षेचे विशेष आकर्षण आहे. मात्र, अनेकांना या परीक्षेबाबत योग्य माहिती नसते, ती उणीव या मार्गदर्शनातून दूर होणार आहे.
‘एनडीए’मध्ये (NDA Career Guidance) मुलांबरोबर मुलींनाही करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 10 वीनंतर, 11 वी, 12 वीपासूनच ‘एनडीए’ची तयारी कशी करावी, लेखी परीक्षेचे स्वरूप, एसएसबी, शारीरिक चाचणी, अभ्यासक्रम आणि त्याचे नियोजन, याची संपूर्ण माहिती या उपक्रमात देण्यात येणार आहे.”
“संरक्षण सेवेतील उच्च पदावर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांना जाता यावे, हा संस्थेचा मानस आहे. ‘एनडीए’सोबतच भारतीय संरक्षण सेवा प्रवेशासाठीच्या इतर स्पर्धा परीक्षा, कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस आणि तांत्रिक विभागातील उच्च पदासांठी आवश्यक स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालक वर्गाला मिळणार आहे. मार्गदर्शन सत्रास विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके यांनी केले आहे.”