NDMA Recruitment | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांची भरती; २,०८,७०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत नोकरीची (NDMA Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत ड्युटी ऑफिसर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीएमए भवन, ए-1, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली-110029 येथे अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
केंद्र सरकार, संरक्षण दल किंवा केंद्रीय पोलीस दलातील अधिकारी ज्यांना सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा देण्याचा पाच वर्षांचा अनुभव.
a)(i) पेरेंट केडर किंवा विभागात कायमस्वरुपी समतुल्य नियुक्ती असलेली व्यक्ती अर्ज करू शकते. किंवा (NDMA Recruitment)
समतुल्य पे मॅट्रिक्स किंवा समतुल्य स्तर 9 वर पाच वर्षांच्या सेवेसह, सध्याच्या केडर किंवा विभागामध्ये नियमित नियुक्ती मिळालेली असावी.
b) इच्छुक उमेदवारानं विज्ञान किंवा अर्थशास्त्र, स्टॅटिस्टिक्स, डिफेन्स स्टडीज, कॉमर्स किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी किंवा समकक्ष पदवी मिळवलेली असावी.

वेतन –
नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराला लेव्हल-11नुसार 67,700 ते 2,08,700 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. (NDMA Recruitment)

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट – https://ndma.gov.in/
PDF जाहिरात – https://workmore.in/Advt_DO_OPS_apr23.pdf

Recent Articles