मुंबई | सरकारी नोकरीचा अनुभव घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे “यंग फेलो” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा रिक्त जागा भरण्यात (NIRDPR Bharti 2023) येणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
“यंग फेलो” या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शैक्षणिक पात्रता –
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही प्रवाहात पदव्युत्तर पदवी/2-वर्षाचा पीजी डिप्लोमा.
- किमान शैक्षणिक मानके : माध्यमिक (दहावी) किंवा समकक्ष परीक्षेत 60% गुण; उच्च माध्यमिक (बारावी) किंवा कोणत्याही शाखेतील समकक्ष परीक्षेत 50% गुण; सामाजिक विज्ञान विषयात पदवी स्तरावर 50% गुण; आणि सामाजिक विज्ञान विषयात पदव्युत्तर स्तरावर 50% गुण.
अर्ज शुल्क –
- सामान्य/OBC/EWS उमेदवार – रु.300/-
- SC/ST/PWD उमेदवार – निशुल्क
यंग फेलो पदांसाठी रु.35,000/- (रुपये पस्तीस हजार) फक्त दरमहा NIRD आणि PR च्या निकषांनुसार क्लस्टर असलेल्या ब्लॉकच्या बाहेर प्रवास आणि निर्वाह खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल.
PDF जाहिरात | https://workmore.in/NIRDPR.PDF |
ऑनलाईन अर्ज करा | https://workmore.in/nirdpr/apply |
अधिकृत वेबसाईट | www.nirdpr.org.in |