Notice Period वर आहात? चिंता नको; या काळात नक्की काय करावं आणि काय करू नये; वाचा

अनेकजण नोकरी करताना आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल का या संधीच्या शोधात असतात. त्यामुळे जेव्हा त्यांना नवीन ठिकाणी चांगली ऑफर मिळते तेव्हा आधीच्या कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. अशावेळी आधीची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जॉईन होण्याचा दरम्यान जो काळ जातो त्याला नोटीस पिरेड (Notice Period) म्हणून ओळखले जाते.

कार्पोरेट क्षेत्रात प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड (Notice Period) ठेवते. कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्याला नोटीस पिरेड (How to complete Notice Period) पूर्ण करूनच कंपनी सोडता येते. काही कंपन्यांमध्ये हा नोटीस पिरेड (Notice Period) एक महिन्याचा असतो तर काही कंपन्यांमध्ये तीन महिन्याचा असतो. परंतु एकदा का राजीनामा दिला की बऱ्याच कर्मचाऱ्यांना हा काळ त्रासदायक वाटत असल्याचे सांगतात.

नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस पिरेडच्या काळात कंपनीकडून अपेक्षित सपोर्ट मिळत नाही असे काही जण म्हणतात. मात्र असं असेलच असं नाही. काही कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड (How to spend notice period in company) चांगलाही ठरतो. त्यामुळे जर तुम्हीही नोटीस पिरेडवर (Notice period do’s and Don’ts) आहात किंवा नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर Notice Period वर असताना नक्की काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे..

Notice Period (नोटीस पिरेड) वर असताना हे करा

  • नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नोटिस पिरेड वर असताना कमी काम करण्याचा विचार मनात येतो. मात्र असे करू नका. नोटीस पिरेड दरम्यान तितक्याच ऊर्जेने काम करा. तुमच्या कामात कमीपणा जाणवल्यास संबंधित वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • नोटिस पिरेड वर असताना तूम्हाला तुमच्या कामाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचे क्लायंट, सहयोगी आणि सहकाऱ्यांना अपडेट देणे आवश्यक आहे. तुमची बदली होईपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या व्यवस्थापकाचे संपर्क तपशील प्रदान करू शकता किंवा कार्यसंघात पुढील कमांड देऊ शकता.
  • नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर तुमच्या सहकाऱ्यांसोबत नोटीस पिरेडवर असताना नेहमीसारखेच चांगले वागा. जरी तुम्ही ही कंपनी सोडून जात असाल तरी तुमचे संबंध टिकवून ठेवा. नोकरी सोडली म्हणजे संबंध संपला असा विचार करू नका.
  • ऑफिसमध्ये असताना तुमच्या मॅनेजर किंवा बॉससोबत भविष्यातील संधींबाबत संवाद साधा. तसंच तुमच्या बॉससोबत चांगले संबंध तयार करा.

हे कधीच करू नका

जरी तुम्हाला वाटत असेल की, बहुतेक कामाचा भार तुम्ही सांभाळता, त्यामुळे आता तुमच्या डेस्कवरील काम करण्यास टाळाटाळ करू नका. यामुळे तुमचं इम्प्रेशन अवघ्या काही कालावधीत कमी होऊ शकतं. तुम्ही वैयक्तिक फोन कॉल्स घेण्याऐवजी किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत बसण्याऐवजी तुमच्या सहकाऱ्यांना मदत करा. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंधही चांगले राहतील. नवीन ऑफिस, त्यांच्या मस्त ऑफिस स्पेसेस, एंटरटेनमेंट झोन इत्यादींबद्दल उत्साही वाटणे स्वाभाविक आहे, परंतु नोटीस पिरेडच्या काळात तुमच्या टीममध्ये याबद्दल बढाई मारू नका. अथवा त्याबद्दल वाजवी चर्चा करू नका.

Recent Articles