NSDP Recruitment | राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र अंतर्गत रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

मुंबई | राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) येथे (NSDP Recruitment) दिनांक १०.०५.२०२३ रोजी होणाऱ्या ०६ कन्सल्टंट्स एपिडेमायोलॉजिस्ट), ०१ कन्सल्टंट्स (मायक्रोबायोलॉजिस्ट), स्टॅटिस्टिशन-कम- प्रोग्रॅमर, ०१ ट्रेनिंग मॅनेजर, ०२ डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, ०१ मीडिया स्कॅनिंग असिस्टंट आणि ०१ सीनिअर एपिडेमायोलॉजिस्ट (INSACOG, NCDC अंतर्गत जिनॉमिक सहायलन्स युनिट) आणि ११.०५.२०२३ रोजी होणाऱ्या ०१ कन्सल्टंट्स (आयटी), ०१ कन्सल्टंट्स (व्हेटरिनरी), ०१ कम्युनिकेशन ऑफिसर, ०१ कन्सल्टंट्स (प्रोक्युअरमेंट) आणि ०१ प्रोग्रॅम मॅनेजर/ अॅडमिनिस्ट्रेटरच्या निवडीसाठी समक्ष मुलाखत. सर्व पदे एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीवर आहेत आणि पुढे वाढू शकतात.

पदाचे नाव – सल्लागार, सांख्यिकी-सह-प्रोग्रामर, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट मीडिया स्कॅनिंग असिस्टंट, वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट, कम्युनिकेशन ऑफिसर, प्रोग्राम मॅनेजर/प्रशासक
पदसंख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रिया – मुलाखती (NSDP Recruitment)
मुलाखतीचा पत्ता – आजार नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (आरोग्य सेवा महानिदेशक) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार २२, शामनाथ मार्ग, दिल्ली- ११००५४
मुलाखतीची तारीख – १० & ११ मे २०२३ (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – ncdc.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/hlG06

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. (NSDP Recruitment)
उमेदवारांची नोंदणी १०.०५.२०२३ (बुधवार) आणि ११.०५.२०२३ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० दरम्यानएनसीडीसी, दिल्ली येथे होईल. वैयक्तिक मुलाखती त्याच दिनांका रोजी होतील. 

समक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए / डीए देण्यात येणार नाही.
समक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यापूर्वी उमेदवाराला टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार  (TOR) त्यांच्या अर्हतेची खात्री करावी लागेल.
सदर पदांकरिता मुलाखत १० & ११ मे २०२३ (पदांनुसार) दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

पासपोर्ट आकारांच्या फोटोसह वैयक्तिक बायोडाटाची एक प्रत आणि पडताळणीसाठी अनुभव प्रमाणपत्रांच्या फोटोकॉपिजसह उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रे सोबत आणावी. (NSDP Recruitment)
तपशिलवार जाहिरात संकेतस्थळ www.iasp.nic.in आणि www.ncdc.gov. in येथे पाहाता येईल. 
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles