नर्सिंग क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी; लाखो रूपये मिळतो पगार, जाणून घ्या सविस्तर | Nursing Career

मुंबई | कोरोना काळानंतर आरोग्य क्षेत्राचे महत्व अधिकच गडद झाले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात नोकऱ्यांची आणि काम करणाऱ्यांची संख्याही वाढू लागलीय. आरोग्य क्षेत्रात सध्या सर्वाधिक नोकऱ्या मिळणारे पद म्हणजेच नर्सिंग (Nursing Career) असून आज आम्ही आपल्याला याच करिअर विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

परिचारिका/परिचर अर्थात नर्स होण्यासाठी सेवा आणि समर्पण या गुणांसोबतच नर्सिंगशी (Nursing Career) संबंधित अभ्यासक्रमही करणे आवश्यक आहे. नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि ट्रेनिंगच्या मदतीने या करिअरशी संबंधित व्यावहारिक गोष्टींची चांगली माहिती मिळवता येते. 

नर्सिंग करिअरची सुरुवात कशी करावी (Nursing course information)

  • ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर (एएनएम) कोर्स (नर्सिंग कोर्स) करता येईल. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा असून किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.
  • साडेतीन वर्षांचा जनरल नर्स मिडवाइफरी (GNM) कोर्सही करू शकता. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात 40 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशनही करता येते. यासाठी किमान पात्रता 45 टक्के गुणांसह इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात बारावी उत्तीर्ण अशी आहे. यासाठी तुमचे वय किमान 17 वर्षे असणे आवश्यक आहे.

नर्सिंगसाठी किती असेल फी?
जर तुम्हाला चांगल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातून नर्सिंगमध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला ₹ 20000 ते 95000 पर्यंत वार्षिक शुल्क भरावे लागेल. डिप्लोमाचे शुल्कही कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयानुसार असते. तर पदवीसाठी फी वेगवेगळी असू शकते.

BSC नर्सिंग कोर्ससाठी खासगी संस्था वार्षिक शुल्क 40 हजार ते 1 लाख 80 हजारपर्यंत आकारतात. येथे GNM कोर्सची फी 45 हजार ते 1 लाख 40 हजारपर्यंत आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये फी कमी आहे.

ज्यांना जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोणताही अनुभव नाही, ते भारतीय नर्सिंग कौन्सिलमधून किमान 6 ते 9 महिने नर्सिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतात.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथे मिळतात नोकरीच्या संधी

नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह, इतर विविध उद्योग आणि संरक्षण सेवांमध्ये प्रशिक्षित नर्सेससाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याचबरोबर परदेशातही भारतीय परिचारिकांची मागणी वाढत आहे.

किती मिळतो पगार
– मुख्य नर्सिंग सेवा – 4 LPA
– नर्सिंग असिस्टंट- 2.5 LPA
– सामुदायिक आरोग्य परिचारिका- 3.5 LPA
– आपत्कालीन परिचारिका – 2 LPA
– नर्सिंग इन्चार्ज असिस्टंट – 2 LPA
– नर्सिंग इन्चार्ज – 3 LPA

Recent Articles