परभणी महानगरपालिकेत रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Parbhani Mahanagarpalika Job

परभणी | परभणी शहर महानगरपालिकेतर्फे दिवाणी, फौजदारी, कामगार विषयक तसेच इतर न्यायालयीन कामकाज चालविणेसाठी वकिलांचे नवीन पॅनल बनविणेसाठी, इच्छुक वकीलांकडून खालील अटी व शर्तीस अधिन राहून दि. १६/०६/२०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. विलंबाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. (Parbhani Mahanagarpalika Job)

शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने संबंधीत न्यायालयात किमान ५ वर्षांचा जिल्हा न्यायालयात दिवाणी/फौजदारी किंवा व औद्योगीक व कामगार न्यायालयात कामगार विषयक प्रकरणे चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. (Parbhani Mahanagarpalika Job)

वेतनश्रेणी
महानगरपालिकेच्या मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक प्रकरणासाठी रु.२५०००/- मा. उच्च न्यायालयातील प्रत्येक प्रकरणासाठी रु. १००००/– व मा. जिल्हा न्यायालयापर्यंतच्या प्रत्येक प्रकरणामध्ये रु. ३५००-५०००/- तसेच सर्व न्यायालयात कॅव्हेट अर्ज दाखल करणेसाठी प्रती कॅव्हेट अर्ज रु. १०००/- एवढी फी संबंधीत वकीलास अनुज्ञेय राहील.

पॅनल वकीलांच्या नियुक्तीबद्दल आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांचा निर्णय अंतीम राहील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – https://shorturl.at/tDG45
अधिकृत वेबसाईट – www.pcmcparbhani.org

Recent Articles