नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पुणे पशुसंवर्धन विभाग (Pashusavardhan Vibhag Bharti) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 446 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 16 जून 2023 आहे. अर्ज शुल्क अमागास उमेदवारांसाठी Rs.1000 तसेच मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक उमेदवारांसाठी Rs.900 आहे. (Pashusavardhan Vibhag Bharti)
पद संख्या –
पशुधन पर्यवेक्षक – 376 पदे
वरिष्ठ लिपीक – 44 पदे
लघुलेखक (उच्चश्रेणी) – 02 पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी) – 13 पद
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 04 पद
विविध संवर्ग पदे – 07 पद
स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-६० यांना राहतील.
तसेच उपरोक्त एकूण पदे दि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरावयाची असून संदर्भात पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या पदांवर गुणानुक्रमानुसार प्रथम नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यास आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-६७ हे सक्षम राहतील. (Pashusavardhan Vibhag Bharti)
याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याचा राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल.
अधिकृत वेबसाईट – www.ahd.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – http://bit.ly/3GEQRrth (Pashusavardhan Vibhag Bharti)